वीज चोरीप्रकरणी डोंबिवलीतील हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल

वीज चोरीप्रकरणी डोंबिवलीतील हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल

वीज चोरीप्रकरणी डोंबिवलीतील हॉटेल चालकावर गुन्हा सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ५ ः डोंबिवली पश्चिमेतील जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये गेल्या दीड वर्षापासून वीज चोरी होत असल्याची घटना महावितरणच्या कारवाईत उघड झाली आहे. २३ लाख १४ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याप्रकरणी हॉटेल चालक जितेंद्र म्हात्रे यांच्याविरोधात कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण परिमंडळात महावितरणची वीज चोरांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील राहूल नगर परिसरात असलेल्या जय मल्हार या फॅमिली रेस्टॉरंटच्या मिटरची तपासणी करण्यात आली. मिटरचे सील हाताळल्याचे व मिटरशी छेडछाड केल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले. हे संशयित मिटर ताब्यात घेत ग्राहकासमक्ष महावितरणच्या चाचणी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. यामध्ये मिटरमधील अतिरिक्त सर्किट व छोटा अॅंटेना लावून मिटरची गती कमी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सूरज माकोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हॉटेल चालक जितेंद्र म्हात्रे यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके, सहायक अभियंता सूरज माकोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com