सेन्सेक्स पुन्हा ६० हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स पुन्हा ६० हजार
सेन्सेक्स पुन्हा ६० हजार

सेन्सेक्स पुन्हा ६० हजार

sakal_logo
By
निर्देशांकाची साठहजारी मनसबदारी कायम निफ्टी १८ हजारांजवळ मुंबई, ता. ५ ः ‘ओमायक्रॉन’ची भीती दूर सारत गुंतवणुकदारांनी बुधवारी सलग चौथ्या दिवशीही खरेदी केल्याने सेन्सेक्स पुन्हा साठ हजारांपार गेला तर निफ्टी १८ हजारांजवळ आला. २० डिसेंबरपासून आजपर्यंत गुंतवणुकदार २० लाख कोटींनी श्रीमंत झाले आहेत. भारतीय शेअर बाजार निर्देशांक आज सुमारे पाऊण टक्क्यांच्या जवळपास वाढले. बँका आणि वित्तसंस्थांचे शेअर वाढले तर आयटी आणि औषध कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले. आज सेन्सेक्स ३६७.२२ अंश वाढून ६०,२२३.१५ अंशांवर स्थिरावला, तर निफ्टी १२० अंशांनी वाढून १७,९२५.२५ अंशांवर गेला. २० डिसेंबरला निर्देशांकांची घसरण थांबली व दुसऱ्या दिवसापासून आगेकूच सुरु झाली. तेव्हापासून आतापर्यंत निर्देशांक सुमारे दहा टक्के वाढले आहेत. बीएसई वरील सर्व समभागांचे एकूण मूल्य २० डिसेंबर रोजी २५२ लाखकोटी रुपये होते तर आज ते २७२ लाखकोटी रुपये झाले. आज टेक महिंद्र व इन्फोसिस प्रत्येकी ५१ रुपयांनी घसरून अनुक्रमे १,७३६ व १८४४ रुपयांपर्यंत आले. एचसीएल टेक (बंद भाव १,३११ रु.), विप्रो (७१३), टीसीएस (३,८६१), डॉ. रेड्डीज लॅब (४,७८९) व सनफार्मा (८३५) यांचे भाव घसरले. तर दुसरीकडे भाव वाढलेल्या शेअरमध्ये बजाज फिनसर्व्ह ८७० रुपयांनी वाढून १७,९८३ रुपयांवर तर बजाज फायनान्स ३२५ रुपयांनी वाढून ७,६६८ रुपयांवर गेला. ६८ रुपयांनी वाढलेला कोटक बँक १,९२१ रुपयांवर गेला, तर मारुती ७,७७३ रुपयांपर्यंत पोहोचला. एचडीएफसी बँक (१,५६४), अॅक्सीस बँक, टाटास्टील, एशियन पेंट या शेअरचेही भाव वाढले. आजचे सोन्याचांदीचे भाव ................................... सोने - ४९,०८० रु. चांदी - ६२,३०० रु.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top