संक्रातीला यंदा गोडवा वाढणार

संक्रातीला यंदा गोडवा वाढणार

संक्रातीला यंदा गोडवा वाढणार तीळ, साखर, गुळाचे भाव घसरले वाशी, ता. ६ (बातमीदार) ः नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी संक्रांतीला तिळगूळ देण्याची परंपरा आहे. याकरिता विशेषत: गृहिणीची लगबग सुरू असते. यंदाही बाजारपेठेत तिळगुळाचे साहित्य दाखल झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर कमी असल्‍याने संक्रांतीचा गोडवा चांगलाच वाढणार आहे. पौष महिन्यात येणारी मकरसंक्रांत सर्वत्र परिवर्तन, उत्साह आणि आनंदाची पेरणी करून जाते. उत्तरायणापासून दिवस तीळ-तीळ वाढतो म्हणजेच ऊन वाढत जाते, असे बोलले जाते. सौर कालगणनेशी संबंधित या भारतीय सणात तिळगुळाचे महत्त्व मोठे आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण देण्याची प्रथा आहे. हरभरा, ऊस, बोर, गव्हाची ओंबी, तीळ आदी सामग्री भरून सुगडांची पूजा केली जाते. घरोघरी वाणासोबतच तिळगूळ देण्याची प्रथा आहे. यंदा तीळ, गुळाचे दर आटोक्यात असून गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे. आजमितीस तीळ १४५ ते १६० रुपये प्रति किलो, गूळ ३५ ते ५० रुपये प्रति किलो आणि साखर ३३ ते ४२ रुपये प्रति असा भाव आहे. गतवर्षाच्या तुलनेत ५ ते १० रुपयांचा फरक पडला आहे. सामग्रीचे प्रतिकिलो दर साखर - ३३ ते ४२ चिकी गूळ - ३५ ते ५० तीळ - १४५ ते १६० गतवर्षी तीळ, गूळ, साखरेच्या किमती अधिक होत्‍या. यंदा मात्र या वस्‍तूंचे भाव गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. गतवर्षी तीळ १६० ते १९० रुपये किलो होता. - नरेंद्र शिंदे, व्यापारी तिळगूळ करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी काही प्रमाणात रेडीमेड तिळगूळ घेते. मात्र यंदा घरीच तिळगुळाचे लाडू तयार करणार आहे. तीळ, साखर, गुळाचे दर कमी झाल्‍याने दिलासा दिलासा मिळाला आहे. - जागृती मोकाशी, गृहिणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com