कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर रोठ संघ प्रथम विजेता

कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर रोठ संघ प्रथम विजेता

कबड्डी स्पर्धेत वाघेश्वर रोठ संघ प्रथम विजेता रोहा (बातमीदार) : मालससई येथील श्री भैरवीनाथ क्रीडा मंडळतर्फे राष्ट्रवादी आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ६० किलो वजनी गटाचे सामने राज्यस्तरीय स्पर्धेत ६४ संघांनी अक्षरशः मैदानावर रंगत आणली. या स्पर्धेत वाघेश्वर रोठ संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक माणकेश्वर आमडोशी, तृतीय क्रमांक नवतरुण मंडळ तळाघर यांना मिळाला. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते सामन्यांचे उद्‍घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, अनंत देशमुख, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम कराळे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट चढाई नवतरुण तळाघर संघाचा स्वप्नील जाईलकर, उत्कृष्ट पक्कड आमडोशी संघाचा हरिष भोसले, मालिकावीर रोठ संघाचा आशिष मोरे, तर पब्लिक हिरो आमडोशी संघाचा रोहित गोळे यांना देण्यात आले. रोहा : कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारा वाघेश्वर रोठ संघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com