आठवडा बाजारावर ओमिक्रॉनचे सावट

आठवडा बाजारावर ओमिक्रॉनचे सावट

आठवडा बाजारावर ओमिक्रॉनचे सावट कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने बंदीची शक्यता तळा, ता. ६ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. राज्यातही प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडा बाजारावर ओमिक्रॉनचे सावट आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आठवडा बाजारांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. तळा शहरात बुधवारी भरणारा बाजार हा तालुक्यातील एकमेव आहे. दर बुधवारी असणाऱ्या या बाजारात नेहमी गर्दी असते. या ठिकाणी सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. सुरमई, बोंबील, बारीक सुकट, अंबाडी सुकट, मांदेली, म्हाकल्या, खारे मासे अशा अनेक प्रकारची सुकी मासळीची विक्री होते. ही सुकी मासळी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची संख्या जास्त असून या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास खेडोपाड्यातही प्रसार होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या शहरात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र आहे. मात्र आठवडा बाजारात भाज्या कमी दराने मिळत असल्याने या ठिकाणी भाजीपालाही मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. भाज्यांसह खारी, बिस्कीट, लहान मुलांचे कपडे विक्रेते, कटलरी विक्रेते आदी प्रकारचे व्यापारी आठवडा बाजारपेठेत व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागवितात; परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा आठवडा बाजारांवर बंदी येण्याची शक्यता असल्याने आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com