मुंबईत डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना उपचारासाठी स्वतंत्र विभाग

मुंबईत डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना उपचारासाठी स्वतंत्र विभाग

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विभाग कोरोनावरील उपचारासाठी मुंबई पालिकेकडून खबरदारी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा फटका मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने पॉझिटीव्ह सापडलेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची सुविधा रुग्णालयातच केली असून, नायर आणि केईएममध्ये पुन्हा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. नायर रुग्णालयात ३५ खाटांचा स्वतंत्र विभाग निवासी डॉक्टरांसाठी, तर केईएम रुग्णालयातही २२ खाटांचा विभाग तयार करण्यात आला आहे. राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. याचा सर्वाधिक फटका रुग्णालय प्रशासनांना बसत आहे. एका वेळेस अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी पॉझिटीव्ह येत असल्याने प्रत्येक विभागाची जबाबदारी वाटून देण्यात आली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ६१ निवासी डॉक्टर पाॉझिटीव्ह आले आहेत. केईएम रुग्णालयात ४० हून अधिक, नायर ४०, कूपर ७ आणि सायनचे जवळपास ४० डॉक्टर्स पॉझिटीव्ह आले आहेत; तर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मिळून एकूण १८० हून अधिक डॉक्टर पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधित डॉक्टरांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. इतर गृह विलगीकरणात आहेत. यासह म्हाडा हॉस्टेलमध्येही विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच शांतिनिकेतन हॉस्टेलमध्ये प्राध्यापकांची सोय करण्यात आली आहे. - डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com