मोनो रेलद्वारे महसूल वाढीचे प्रयत्न, जागा भाड्याने देण्यासाठी सल्लागार नेमणार

मोनो रेलद्वारे महसूल वाढीचे प्रयत्न, जागा भाड्याने देण्यासाठी सल्लागार नेमणार

मोनो रेलद्वारे महसूलवाढीचे प्रयत्न जागा भाड्याने देण्यासाठी सल्लागार नेमणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एमएमआरडीए) पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो रेल प्रकल्पातून निधी मिळविण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत. मोनो मार्गावरील व्यावसायिक जागा भाड्याने देऊन यामधून अधिक महसूल निर्माण करण्यासाठी प्रशासनाने सल्लागार नेमण्याचे ठरवले आहे. या कामासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा डेपो हा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला; तर वडाळा डेपो ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा मार्च २०१९ मध्ये सुरू करण्यात आला. दोन्ही टप्पे सुरू झाल्यानंतरही मोनोकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एमएमआरडीएला दरदिवशी लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटात आलेला हा मार्ग नफ्यात आणण्यासाठी एमएमआरडीएने प्रयत्न सुरू केले आहेत. मेट्रो वन जाहिरातीच्या माध्यमातून दर वर्षी सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते. याच धर्तीवर मोनोसाठी निधी उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मोनो रेलचे विविध मार्गाने आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. या कामासाठी ३२.४५ लाख रुपये खर्चाची निविदा नुकताच काढण्यात आली आहे. पात्र कंपन्यांना २४ जानेवारीपर्यंत निविदा सादर करता येतील; तर १७ जानेवारीला निविदापूर्व बैठकीचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतर्फे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com