आता, मोठ्या ग्रामपंचायतीत सुरू होणार विलगिकरण केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता, मोठ्या ग्रामपंचायतीत सुरू होणार विलगिकरण केंद्र
आता, मोठ्या ग्रामपंचायतीत सुरू होणार विलगिकरण केंद्र

आता, मोठ्या ग्रामपंचायतीत सुरू होणार विलगिकरण केंद्र

sakal_logo
By
वीस मोठ्या ग्रामपंचायतींत सुरू होणार विलगीकरण केंद्र ठाण्यातील वाढत्या कोरोना प्रसारामुळे प्रशासनाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ ः ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात नुकतेच ग्रामीण भागातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. अशातच जर, ग्रामीण भागात रुग्ण संख्येत आणखी वाढ झाल्यास जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लक्षणेविरहित रुग्णांना त्यांच्या घराजवळच उपचार मिळण्यास मदत होणार आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात देखील दुपटीने रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याची गांभीर्याने दाखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाल्यास तेथील रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये विलागीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या सूचनाही गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २० मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लक्षणे नसलेल्या केवळ कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यापैकी ज्याला उपचाराची आवश्यकता असेल त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top