ठाणे पालिकेचा आरोग्य विभागाला कोरोनाचा विळखा

ठाणे पालिकेचा आरोग्य विभागाला कोरोनाचा विळखा

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोनाचा विळखा वैद्यकीय अधिकाऱ्यासह नर्स आणि कर्मचाऱ्यांचा समावेश सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ ः ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. आता ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागालाच कोरोनाचा विळखा बसला असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापलिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४६, तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ३८ अशा ८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, पदवीपूर्व विद्यार्थी, विविध विभागांतील टेक्नीशियन आणि एका प्राध्यापकाचा समावेश आहे. ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता महापालिकेच्या कळवा रुग्णालयात देखील कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. कळवा मेडिकल कॉलेजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे ३०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ९ पदवीपूर्व विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे; तर निवासी डॉक्टर म्हणून सेवा देणाऱ्या ८ डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय येथील पॅरामेडीकल विभागातील टेक्नीशिअन स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातील ९ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर (प्रोफेसर) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांना लक्षणे आढळून आली आहेत त्यांना महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील रुग्णालयात, तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांना भाईंदर पाडा येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांनी दिली. -------------------- ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या ९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील १० वैद्यकीय अधिकारी यांच्यासह १४ परिचारिका, २० वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी, एक औषध निर्माते आणि एक प्रयोग शाळेतील कर्मचारी अशा ४६ जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ................................... ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आणि परिचारिका यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर्सला कोरोनाची लागण झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com