मुंबईतील असंख्य शिक्षक कोरोनाच्या विळख्यात

मुंबईतील असंख्य शिक्षक कोरोनाच्या विळख्यात

मुंबईतील असंख्य शिक्षक कोरोनाच्या विळख्यात शाळेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : मुंबई आणि परिसरातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद असल्या, तरी गेल्या काही दिवसांपासून असंख्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. परिणामी शाळा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबई आणि परिसरातील काही शाळा प्रशासनाने गरज नसतानाही शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. सरकारने अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असताना शिक्षकांना शाळांमध्ये बोलावणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक शाळांमधील शिक्षकांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह येत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरातील पहिली ते नववी आणि अकरावीपर्यंतच्या सर्व शाळा व वर्ग बंद करून शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र ते आपल्याला मिळाले नसल्याचा दावा करत अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा बंद असल्या तरी शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के आहे. शालेय शिक्षण विभागाने आॅनलाईन वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना वर्क फ्राॅम होम करू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे आणि टीचर्स डोमोक्रॅटिक फ्रंटचे राजेश पंड्या यांनी केली आहे. संसर्गानंतरच्या सूचनांचे काय? राज्य शिक्षण मंडळाच्या आगामी लेखी परीक्षा लक्षात घेता मुंबई, ठाणे आदी परिसरात दहावी-बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यातच एखाद्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्यास शाळा बंद करावी का, शिक्षक-कर्मचाऱ्याची उपस्थिती किती असावी, याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना अद्याप मिळालेल्या नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com