मुंबई डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

मुंबई डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

३०० पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोना बाधित होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता; आरोग्य व्यवस्थेवर ताण सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : राज्यभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाचा डॉक्टरांना विळखा पडला आहे. सुमारे तीन आठवड्यांत राज्यभरातील ३०० पेक्षा अधिक डॉक्टर बाधित झाले असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात बुधवारपर्यंत १७० डॉक्टर कोरोनाबाधित झाले होते. ही संख्या गुरुवारी (ता. ६) ३०८ च्या पुढे पोचली. केवळ मुंबईतच गुरुवारी आणखी ३० डॉक्टर बाधित झाले. याशिवाय यवतमाळ, नागपूर आदी शहरांतील रुग्णालयांतील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने ही संख्या ३०८ च्या पुढे गेली. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या बाधित होण्याचे प्रमाण वाढत राहिले, तर मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ... मुंबईत बिकट स्थिती मुंबईतील जे.जे., के.ई.एम., नायर, कूपर आणि शीव येथील टिळक रुग्णालयातील डॉक्टरांबरोबरच राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील अनेक निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत बाधित डॉक्टरांची संख्या आता २६३ पेक्षा अधिक झाली आहे. .... रुग्णालय बांधित डॉक्टरांची संख्या जे.जे. रुग्णालय- ८३ के.ई.एम.- ६० सायन- ८० नायर- ४५ एचबीटीएमसी/कूपर- ७ आरजीएमसी ठाणे- १० व्हीडीजीएमसीएच लातूर- १ एसव्हीएनजीएमसी यवतमाळ- ४ एसबीएचजीएमसी धुळे- ४ जीएमसी मिरज- २ आयजीजीएमसी नागपूर- १ जीएमसी औरंगाबाद- २ व्हीएमजीएमसी सोलापूर- १ बीजेजीएमसी पुणे- ५ जीएमसी नांदेड- १ वायसीएमएच पिंपरी- २ ...... पीजी कौन्सिलिंगची अट शिथिल करून एमबीबीएस उर्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना सेवेत घ्यावे. यामुळे राज्यात अडीच ते तीन हजार डॉक्टर उपलब्ध होतील. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण काहीसा हलका होईल. - डॉ. अविनाश माधव दहिफळे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड ........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com