महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे हीच भाजपची संस्कृती आहे का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे हीच भाजपची संस्कृती आहे का
महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे हीच भाजपची संस्कृती आहे का

महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे हीच भाजपची संस्कृती आहे का

sakal_logo
By
महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने ही भाजपची संस्कृती आहे का? उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सवाल मुंबई, ता. ६ : महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे ही भाजपची संस्कृती आहे काय, असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केला. तसे असेल तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या आयटी सेलने एक आक्षेपार्ह आणि राजकीयदृष्ट्या केवळ चिखलफेक करणारे ट्विट केले. त्याचे भाजपच्या महिला आघाडी नेत्या समर्थन करत आहेत. त्यामुळे हे समर्थन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मान्य असेल तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजपचे लोकं वेगवेगळे संस्कार शिकत असतात; परंतु ज्या जितेंद्रने चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला त्याचे म्हणणे भाजपला मान्य आहे का, हे तरी सांगावे. नसेल तर आमची हीच संस्कृती आहे, हे स्पष्ट करावे. या कारवाईच्या मागे जो सूत्रधार आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करत गोऱ्हे यांनी भाजपच्या आयटी सेलकडून केल्या जात असलेल्या कारवायांचा निषेध केला.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top