मुंबईत पुन्हा कोविड लसीची बोगस प्रमाणपत्र

मुंबईत पुन्हा कोविड लसीची बोगस प्रमाणपत्र

बनावट लस प्रमाणपत्र विकणाऱ्याला धारावीत अटक सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ ः कोरोनाची एकही लस न घेता अनेक नागरिकांकडे लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्याला मुंबई पोलिसांनी धारावीतून अटक करण्यात आली. सेकारन नाडार (वय ३६) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सेकारन नाडार याचे धारावीत इंटरनेट कॅफे आहे. या कॅफेतून कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. त्या व्यक्तीला बनावट प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी कॅफेतून बनावट प्रमाणपत्रांचे अनेक पुरावे आढळले. त्यानुसार पोलिसांनी नाडार याला अटक केली. यापूर्वीही पोलिसांनी बनावट लस प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना अटक केली होती. --- बनावट प्रमाणपत्राची मोडस ऑपरेंडी सेकारन नाडार हा त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक परराज्यांतील डॉक्टरला पाठवत होता. त्या डॉक्टरकडून संबंधित ग्राहकाने लस घेतल्याचे दाखवत नोंदणी केली जात होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध होते. विशेष म्हणजे कोविन अॅपवरही लस घेतल्याची नोंदणी होत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com