३६ तासांचा मेगाब्लॉक

३६ तासांचा मेगाब्लॉक

३६ तासांचा मेगाब्लॉक ठाणे-कळवा धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ८) दुपारी दोन वाजल्यापासून सोमवारी (ता. १०) मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गांवर ब्लॉक असणार आहे. परिणामी, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी नवीन टाकलेल्या रुळांची कापणी, जोडणी आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या, अर्धजलद लोकल सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाही. या लोकल पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. दुपारी दोननंतर अप धीमी, अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि शेवटच्या स्थानी निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशिरा पोहोचतील. शनिवारी दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या, अर्ध जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी दोननंतर डाऊन धीम्या, अर्धजलद सेवा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. चौकट ब्लॉक कालावधीतील कामे ब्लॉकदरम्यान ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला रेल्वे रूळ कापून सध्याच्या डाऊन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिलेंरिंग स्विच, तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे ब्लॉक कालावधीत केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, एक डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. चौकट कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली प्रवाशांचे हाल ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बस चालवण्याची व्यवस्था केली आहे. ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून सुटणाऱ्या उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील. सोमवारी (ता.१०) रोजी लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावतील. एक्स्प्रेस सेवेतील बदल शनिवारी (ता. ८) सुटणारी अमरावती- मुंबई एक्स्प्रेस (१२११२), नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (१२१४०), नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११) रद्द केल्या आहेत; तर शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता.९) रोजी सुटणारी मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (११००७ / ११००८), मुंबई-जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०७१ / १२०७२), मुंबई- मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९ /१२११०), मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०१), मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन (१२१२३ /१२१२४), मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (१२१११), मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (१२१३९), मुंबई - गदग एक्स्प्रेस (१११३९), मुंबई- नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (१७६१२) रद्द केल्या आहेत. रविवारी (ता. ९) आणि सोमवारी (ता. १०) रोजी सुटणारी आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२), गदग -मुंबई एक्स्प्रेस (१११४०) रद्द केल्या आहेत. पुणे येथे एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) रोजी सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (११०३०) पुण्याहून एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन रविवारी (ता. ९) आणि सोमवारी (ता.१०) रोजी सुटणारी मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (११०२९). शनिवारी (ता. ८) रोजी आणि रविवारी (ता. ९) रोजी सुटणारी दादर- हुबळी एक्स्प्रेस (१७३१८).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com