१९ कोटींच्या वीजचोरीचा महावितरणला झटका

१९ कोटींच्या वीजचोरीचा महावितरणला झटका

१९ कोटींच्या थकबाकीचा महावितरणला झटका आठ महिन्यांत ३,६५५ प्रकरणे उघडकीस सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : महावितरणची थकबाकी वाढत चालली आहे. त्यामुळे परिमंडळांनी वीजबिल वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार भांडुप परिमंडळात एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १९ कोटी १० लाख रुपयांची ३,६५५ प्रकरणे उघडकीस आली आहेत. भांडुप परिमंडळात वीजबिल वसुली सोबतच वीज जोडणी तपासणी ०-३० रीडिंग नोंदवत असलेल्या मिटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरू असतात. या तपासणीमध्ये भांडुप परिमंडळात एप्रिल ते डिसेंबर २०२१ पर्यंत ६७ लाख ४८ हजार १९२ युनिटची उघडकीस आली आहे. यात ठाणे मंडळ कार्यालयाअंतर्गत ६९३ प्रकरणांत चार कोटी आठ लाख, वाशी कार्यालयात १,५६१ प्रकरणांत सहा कोटी चार लाख आणि पेण मंडळ कार्यालयात ५९८ प्रकरणांत एक कोटी ५४ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. मोहिमेत तात्पुरता वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची २१ कोटी ९५ लाख, तसेच थकबाकी असल्याने मीटर काढून आणलेल्या घरगुती ग्राहकांचे ४० कोटी थकीत आहेत. तात्पुरता वा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी विजेचे थकीत बिल भरून पुरवठा सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com