मेट्रो वनची प्रवासी संख्या घटली

मेट्रो वनची प्रवासी संख्या घटली

मेट्रो वनची प्रवासी संख्या घटली वर्क फ्रॉम होमचा सेवेला फटका सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो वनच्या प्रवाशांची संख्या डिसेंबर अखेरीस २ लाखांच्या वर गेली होती. मात्र, जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. परिणामी, मेट्रो वनचे ४० हजारांहून अधिक प्रवासी कमी झाले आहेत. कोरोना काळानंतर डिसेंबर महिन्यात मेट्रो वनची सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद झाली होती. सुमारे २ लाख २ हजारांहून अधिक प्रवासी वाढले होते. मात्र, जानेवारीच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. काहींना दिवसाआड कार्यालयात येण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना उतरती कळा लागली आहे. चौकट फेऱ्या घटविण्याचा विचार डिसेंबरच्या तुलनेत ४० हजार प्रवासी संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. यासह आता मेट्रोच्या ५ ते १० फेऱ्या कमी करण्याचे नियोजन, नवीन नियमावलीचे पालन करण्याचे नियोजन सुरू आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाद्वारे देण्यात आली. तारीख प्रवासी ३ जानेवारी १.९० लाख ६ जानेवारी १.६० लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com