मंदा म्हात्रे यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लॉट चे लोकार्पण

मंदा म्हात्रे यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लॉट चे लोकार्पण

मंदा म्हात्रे यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण वाशी, ता. ७ (बातमीदार) ः ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोविड केयर सेंटर येथे आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, निशांत भगत, महामंत्री निलेश म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, कार्यकारी अंभियता अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण जगावर आलेल्या या संकटाचा सामना करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबईतील नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता मी माझ्या आमदार निधीतून १ कोटींची तरतूद केली होती. नवी मुंबई महापालिकेनेही त्वरित कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली, याबद्दल पालिका आयुक्त अभिजित बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांचे मनापासून आभार. सध्याची कोरोना व ओमिक्रॉनची गंभीर परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु ऑक्सिजन प्लांट उभारल्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासाही मिळाला आहे. माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक आरोग्य सुविधेशिवाय वंचित राहणार नाही, हे एक आमदार म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. --------------- चौकट वाशी ऑक्सिजन प्लांटची क्षमता १२०० एलपीएम असून दिवसाला २२५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर म्हणजेच याद्वारे दिवसाला २.२४ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. याचा लाभ दिवसाला सुमारे १५० नागरिकांना होणार आहे. - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com