दारावे प्रवेशद्वार कमानीवर विद्युत दिवे बसवावेत

दारावे प्रवेशद्वार कमानीवर विद्युत दिवे बसवावेत

दारावे प्रवेशद्वार कमानीवर विद्युत दिवे बसवावेत तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील गावांची ओळख व्हावी यासाठी महापालिकेच्या माध्यमातून २९ गावांच्या परिसरात प्रवेशद्वारावर कमानी तयार करण्यात आल्या आहेत. दारावे गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचे काम पूर्ण झाले असून तिथे विद्युत दिवे बसवण्यात यावेत, तसेच दारावे गावाच्या पूर्व प्रवेशद्वारावर कमानीची निर्मिती करावी, अशी मागणी भाजपचे युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक यांनी मनपा प्रशासनाकडे एका निवेदनात केली आहे. प्रवेशद्वाराची निर्मिती तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. विद्युत दिवे न लावण्यात आल्याने कमानीवरील नाव अंधारात दिसत नाही. शहरातील अनेक गावांच्या कमानींवर पालिकेने विद्युत दिवे लावले असल्याने गावाचे नाव झळाळत असते. मात्र दारावे गावबाबत पालिकेची उदासीनता का? असा प्रश्न रणजित नाईक यांनी उपस्थित केला आहे. लहानसहान बाबींसाठी पालिकेकडे तक्रार का करावी लागते? असे प्रश्न विचारत नाईक यांनी विद्युत दिवे लावण्याची मागणी पत्रातून केली आहे. तसेच दारावे गावाच्या पूर्वेस दारावे सिवूडस रेल्वेस्थानक मार्गावर देखील कमानीची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com