अंबरनाथमधील गोरपे शाळा झाली `कलरफूल`

अंबरनाथमधील गोरपे शाळा झाली `कलरफूल`

अंबरनाथमधील गोरपे शाळा झाली ‘कलरफूल’ शाळेचे रूपडे पालटले; विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण श्रीकांत खाडे ठाणे जिल्हा परिषदेच्या अंबरनाथ तालुक्यातील गोरपे येथील शाळेला ‘मिशन कलरफूल स्कूल’ संकल्पनेतून नवा साज मिळाला आहे. रंग आणि खपल्या निघालेल्या भिंती, कोंदट वास यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात उत्साही वातावरण नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी विभागाच्या सहसंयोजक पायल कबरे यांनी पुढाकार घेत ‘मिशन कलरफूल स्कूल’ या संकल्पनेतून गोरपे शाळेमध्ये रंगरंगोटी केली. अंबरनाथ तालुक्यातील बोहोनोली गावातील जिल्हा परिषद शाळेची यापूर्वी याच संकल्पनेतून रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यानंतर गोरपे गावातील शाळेचे काम हाती घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये जाण्याची आवड निर्माण झाली आहे. या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. त्यात एकूण ६० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून, तीन शिक्षक विद्यादानाचे कार्य करतात. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय मंडळींच्या सहभागातून गोरपे गावातील या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला. शाळेच्या प्रमुख भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यामुळे शाळा व गोरपे गावाच्या शोभेत भर पडली आहे. शाळेच्या आतील भिंतीवर मुलांच्या शैक्षणिक विषयांवर चित्रही रेखाटण्यात आली आहेत. गोरपे गावातील मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ४ जानेवारी रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. मिशन कलरफूल स्कूल संकल्पनेद्वारे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचा विशेषतः आदिवासी भागातील शाळांचा कायापालट करायचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाण्याची इच्छा व्हावी, त्यांची शाळा सुंदर व स्वच्छ दिसावी, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. - पायल कबरे, भाजयुमो, प्रदेश विद्यार्थी सहसंयोजक, अंबरनाथ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com