corona vaccination
corona vaccinationsakal media

आदिवासी दुर्गम भागात शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मागणी

दुर्गम भागात कोरोना लसीकरणासाठी जनजागृती

मुरबाड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (corona infection) मुरबाड (Murbad) तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे (tribal people) कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) पूर्ण करावेत, यासाठी टोकावडे परिसरातील मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष आप्पा घरत (Subhash gharat) यांनी कोरोना जनजागृती मोहीम राबवली. (hundred percent corona vaccination demand in tribal area)

corona vaccination
नवी मुंबई : Containment Zone संदर्भात नवीन नियमावली, जाणून घ्या

आदिवासी, दुर्गम भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबद्दल जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आशा वर्कर्स, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांची संयुक्त बैठक लावून आदिवासी भागात १३ जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करावे, असे आवाहन सुभाषआप्पा घरत यांनी केले.

याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती नंदा उघडा, पंचायत समिती सदस्या जया वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे, डॉ. दिलीप इंगळे, मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, पंचायत समिती सदस्या सीमा घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com