टर्मिनसवर नेहमीइतकीच गर्दी

टर्मिनसवर नेहमीइतकीच गर्दी

टर्मिनसवर नेहमीइतकीच गर्दी समाजमाध्यमावर रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचे बनावट फोटो सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : वाढत्या कोरोनाचे सध्या समाजमाध्यमावरून रेल्वे टर्मिनसवरील गर्दीचे फोटो व्हायरल होत आहेत; परंतु हे फोटो दिशाभूल करणारे, बनावट असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवासी संख्या नेहमीप्रमाणे आहे. त्यात वाढ झालेली नाही. पुन्हा नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची घोषणा होण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. मात्र राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अद्याप परप्रांतीयांनी गावाकडची वाट धरली नाही. एलटीटी, दादर, सीएसएमटी, कल्याण या स्थानकांवर नेहमीइतकीच गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारद्वारे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन घोषित केला होता. यामध्ये प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे लाखोंच्या संख्येत परप्रांतीय कामगार, मजूर एकाच ठिकाणी अडकले. या काळात त्यांचे खूप हाल झाले. त्यामुळे लॉकडाऊनची चाहूल लागताच परप्रांतीय मूळ गावची वाट धरतात. मात्र सध्याच्या घडीला लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे टर्मिनसवर नेहमीप्रमाणे असणारी गर्दी दिसून येत आहे. ... एलटीटीवर गुरुवारी (ता.६) रात्रीच्या वेळी कोणतीही गर्दी किंवा लाठीचार्ज झाला नाही. रेल्वेस्थानकांवर बाहेर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी आणि लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात येत आहे. रेल्वेस्थानकांवर गर्दी होणार नाही, याची पुरेपूर काळजीसुद्धा रेल्वेकडून घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नये, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. ... सीएसएमटी, एलटीटी आणि वांद्रे टर्मिनसवरून उत्तर भारतात जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. मात्र या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग, लसीकरण प्रमाणपत्र तपासले जात आहे. ज्याच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र नसेल त्यांची कोरोना चाचणी केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com