रणबीरच्या स्किल्सवर आलिया फिदा

रणबीरच्या स्किल्सवर आलिया फिदा

रणबीरच्या स्किल्सवर आलिया फिदा बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सध्या ते त्यांच्या व्हेकेशन ट्रीपमुळे चर्चेत आहेत. रणबीर आणि आलिया सार्वजनिक ठिकाणी देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच आलियाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र कॅप्शनमध्ये तिने रणबीरचं कौतुक केलं आहे. आलियाचे हे नो मेकअप आणि नो फिल्टर फोटो खूपच गोड दिसत आहेत. हे फोटो रणबीरने काढल्याचं तिनं म्हटलं आहे. आलियाच्या गालावर पडलेली खळी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. ‘माझ्या बॉयफ्रेंडची फोटोग्राफी स्कील्स दाखवतेय...’ अशी कॅप्शन आलियाने हे फोटो शेअर करताना दिली आहे. रणबीरने क्लिक केल्यामुळे आलियासाठी हे फोटो खास आहेत. त्यांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com