Exam
Exam sakal media

परिस्थितीनुरूप दहावी-बारावीच्या परीक्षांचा निर्णय

कोरोनामुळे ऑफलाईन पद्धतीबाबत मंडळाची सावध भूमिका

मुंबई : मुंबईसह राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (corona patients) झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी-बारावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा (ssc and hsc exam) ऑफलाईन अथवा ऑनलाईन घेण्याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, असे सांगत राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra education board) सावध भूमिका घेतली आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (sharad gosavi) यांनी सांगितले, की दहावी-बारावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. (ssc and hsc exam decision will be taken according to situation)

Exam
नवी मुंबई : Containment Zone संदर्भात नवीन नियमावली, जाणून घ्या

त्यात तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि त्यानंतरच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांना अजून काही दिवसांचा अवधी आहे; मात्र विभागीय मंडळांकडून कोरोना परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करण्याची मागणी नुकतीच काही शिक्षक संघटनांनी केली आहे, तर पालक संघटनांनीही राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या सर्वच परीक्षांबद्दल आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मंडळाकडे तगादा लावला आहे. मुंबईत अद्यापही दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू असल्याने त्यावरही आता पालकांकडून आक्षेप घेतला जात असल्याने मंडळांच्या परीक्षांवर लवकर भूमिका स्पष्ट केली जाण्याची मागणी केली जात आहे.

अशा आहेत परीक्षा

बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ३ मार्चपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांची सुरुवात ही २५ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत संबंधित शाळांमध्ये होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा ही १५ मार्च ते १८ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान होणार आहे. --- विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा आणि मार्च-एप्रिलमधील लेखी परीक्षांसाठी ऐनवेळी निर्णय घेतला जाईल. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com