आमीर-किरण पुन्हा एकत्र

आमीर-किरण पुन्हा एकत्र

आमीर-किरण पुन्हा एकत्र अभिनेता आमीर खानचा लालसिंह चढ्ढा हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. या चित्रपटाची आमीरचे चाहते वाट पाहत असतानाच आमीर आता आणखी दोन चित्रपटांमध्ये काम करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची निर्मिती आमीर खानची कंपनी करणार असली तरी यातील एका चित्रपटाचे दिग्दर्शन आमीरची माजी पत्नी किरण राव करणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी किरणने धोबी घाट या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची बाजू यशस्वीपणे सांभाळली होती. मागील वर्षी किरण राव आणि आमीर खानचा घटस्फोट झाला. सोशल मीडियावरून त्यांनी तसे जाहीर केले, परंतु आता पुन्हा किरण राव आमीर खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे करणार आहेत आणि तेच या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यातील किरण राव दिग्दर्शन करीत असलेला चित्रपट लवकरच सेटवर जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com