भारत विकास परिषद तर्फे गरजुंना मदत

भारत विकास परिषद तर्फे गरजुंना मदत

भारत विकास परिषदेतर्फे गरजूंना मदत ठाणे, ता. ८ ः भारत विकास परिषदेतर्फे कोविडमुळे ज्या कुटुंबांना कुटुंब प्रमुख गमवावा लागला, अशा कुटुंबांना महिना एक हजार रुपयांची मदत कमाल पुढील बारा महिने संपूर्ण भारत देशात देण्यात येणार आहे. यातील मानपाडा व मनोरमा नगर स्थित ११ कुटुंबांना मदतीचे वाटप शुक्रवारी भारत विकास परिषद घोडबंदर रोडतर्फे करण्यात आले. या वेळी भारत विकास परिषद घोडबंदर रोडचे अध्यक्ष सुरीन उसगावकर, सचिव मधु नारायणन उन्नी, दत्ताजी घाडगे, प्रमोद नायर, डॉ. नीलिमा शीलोत्री उपस्थित होते. उर्वरित कासारवडवली भागातील ७ कुटुंबांना मदत वाटप रविवारी करण्यात येणार आहे. या पुढील महिन्यात रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com