आशीष शेलार यांना धमकी देणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशीष शेलार यांना 
धमकी देणारा अटकेत
आशीष शेलार यांना धमकी देणारा अटकेत

आशीष शेलार यांना धमकी देणारा अटकेत

sakal_logo
By
आशीष शेलार यांना धमकी देणारा अटकेत सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ८ ः भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांना फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ओसामा समशेर खान (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ओसामा खानने गुरुवारी (ता. ६) ॲड. शेलार यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. ओसामाचा एका जमिनीबाबत काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याच प्रकरणात त्याच्या मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा खटलाही दाखल आहे. या सर्व प्रकरणामागे आशीष शेलार यांचा हात असल्याचा संशय ओसामाला होता, त्यामुळे त्याने शेलार यांना धमकी दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. धमकीच्या फोननंतर शेलार यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून कळवले आहे. तसेच वांद्रे पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही नोंदवली आहे. --- यापूर्वीही मिळाली होती धमकी ॲड. आशीष शेलार यांना धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी २०२० मध्येही शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यावेळी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केली होती. --- ही विकृती थांबवा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद हे असतातच; पण अशा प्रकारे कुटुंबीयांना धमकी देणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही विकृती आहे, ती थांबवायलाच हवी, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top