एपीएमसी मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता

एपीएमसी मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता

एपीएमसीत संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रतिबंधात्‍मक नियमांची पायमल्‍ली; त्रिसूत्रीचा विसर, प्रशासनाची डोकेदुखी वाशी, ता. ९ (बातमीदार) ः आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून वाशीतील एपीएमसी मार्केट ओळखले जाते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये एपीएमसी मार्केट कोरोना रुग्णांसाठी हॉटस्पॉट ठरली होती. आता तिसऱ्या लाटेत देखील नवी मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. एपीएमसीत होणारी गर्दी रोखणे आरोग्‍य प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. नवी मुंबईतील तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्‍याचे चित्र आहे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसह माथाडी, ग्राहक हे बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसतात. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत दैनंदिन कोरोना रुग्णाचे आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ओमिक्रॉनची रुग्‍णसंख्याही वाढल्‍याने नवी मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याबरोबरच नागरिकांनी सोशल डिस्‍टन्सिंग, मास्क वापरणे यावर बंधने घालण्याच्या सूचना सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. राज्य शासनाने देखील कोरोना नियमांच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील एपीएसमीत कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांची पायमल्‍ली होताना दिसते. कोरोनाच्या पहिल्‍या व दुसऱ्या लाटेत एपीएमसीत पासशिवाय प्रवेश देण्यात येत नव्हता, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे प्रमाणही वाढवले होते. यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांना तत्काळ विलगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात येत होते. आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने त्रिसूत्रींचे कठोर पालन होणे आवश्‍यक आहे. अन्यथा दररोज लाखोंची वर्दळ असलेल्‍या एपीएमसी मार्केटमधील संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाची दमछाक होण्याची शक्‍यता आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाला दिले आहेत. एपीएमसीमध्ये लसीकरण सत्र सुरूच असून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यादेखील वाढवण्यात आलेल्या आहे. - अशोक डक, सभापती, एपीएमसी. एपीएमसी मार्केटमध्ये विनामास्क, सोशल डिस्‍टन्सिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवले असून प्रशासनाकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील कोरोना प्रतिबंधात्‍मक त्रिसूत्रीचे पालन करावे. - सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com