जलकुभांच्या जागेवरून शिवसेना-मनसेत `महाकुंभ` , पीएचडीवरू रंगला सामना

जलकुभांच्या जागेवरून शिवसेना-मनसेत `महाकुंभ` , पीएचडीवरू रंगला सामना

जलकुंभाच्या जागेवरून शिवसेना-मनसेत `महाकुंभ` `पीएचडी`वरून रंगला सामना; भाजपही उतरली मैदानात सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ९ ः ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्‍यक असलेल्या जलकुंभाच्या जागेचे हस्तांतरण नुकतेच कल्याण-डोंबिवली महापालिकेला केले; परंतु या कामावरून शिवसेना-मनसेमध्ये `महाकुंभ` रंगले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मात्र मनसे आमदार राजू पाटील यांना टोला लगावत आमदारांनी विकासकामाचे श्रेय लाटण्यात `पीएचडी` केल्याचे म्हटले आहे. त्यावर पलटवार करत आमदार पाटील यांनीही `श्रेय लाटण्यात डबल पीएचडी केलेले, तसेच मालक बनून फिरण्याऐवजी बाऊन्सर बनून फिरणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये`, असा टोला दीपेश म्हात्रे यांना लगावला आहे. यावरून भाजपने देखील शिवसेनेला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असतानाच जलकुंभासाठीच्या जागेचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जलकुंभाच्या जागेसाठी काही जागा या पालिका प्रशासनास नुकत्याच हस्तांतरित केल्या. जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने लवकरच या गावांमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावर शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदारांनी कामाचे श्रेय लाटण्यात पीएचडी केली आहे. जलकुंभासाठी लागणाऱ्या जागा या सरकारी होत्या. त्यासाठी पालिकेला ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागणार होती. ही रक्कम माफ करण्यात यावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यामुळे आमदार पाटील यांनी त्याचे श्रेय लाटू नये, असे खडे बोल म्हात्रे यांनी आमदार पाटील यांनी लगावले. ॉ ...आता सहन करणार नाही टीकेला उत्तर देताना आमदार राजू पाटील म्हणाले, टक्केवारी खाण्यात डबल पीएचडी केलेल्यांनी माझ्याविषयी बोलू नये. सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या दिशा बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते. त्यांनीच जलकुंभाच्या जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार हा प्रश्न मार्गी लागला आहे. माझ्याकडे सर्व पत्रव्यवहार आहे. यासाठी इतर कोणी पाठपुरावा केला नाही, असे मी म्हणालोच नाही. ठाण्यातून सांगितले जाते म्हणून हे बोलणार. हे आता सहन केले जाणार नाही, असा इशारा देखील पाटील यांनी शिवसेनेला दिला. भाजपची मनसेला साथ शिवसेना खासदार व मनसे आमदार यांच्यात यापूर्वीही मानपाडा रस्त्याच्या कामावरून जुगलबंदी रंगली होती. आता जलकुंभाच्या जागेच्या श्रेयावरून पुन्हा मनसे-शिवसेनेत जोरदार टोलवा-टोलवी सुरू झाली आहे. यावेळी भाजपने मनसे आमदार यांना साथ देत त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केले असून यावर आता शिवसेना काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com