संजय लीला भन्साळींच्या सीरीजमध्ये मनीषा कोईराला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय लीला भन्साळींच्या सीरीजमध्ये मनीषा कोईराला
संजय लीला भन्साळींच्या सीरीजमध्ये मनीषा कोईराला

संजय लीला भन्साळींच्या सीरीजमध्ये मनीषा कोईराला

sakal_logo
By
संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये मनीषा कोईराला प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट हिरामंडीवर काम करीत आहेत. त्यांची ही सीरिज अतिशय भव्य स्तरावर बनत आहे. घोषणा झाल्यापासून सगळीकडे या सीरिजचीच चर्चा सुरू आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री मनीषा कोईरालाची या सीरिजमध्ये एन्ट्री होणार आहे. ती यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तब्बल पंचवीस वर्षांनी मनीषा आणि भन्साळी एकत्र आले आहेत. भन्साळींच्या ‘खामोशी म्युझिकल’ या चित्रपटामध्ये तिने काम केले होते. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत तिला चांगली माहीत आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज हिच्याशीदेखील याकरिता संपर्क साधण्यात आला होता; परंतु काही कौटुंबिक कारणास्तव तिने यामध्ये काम करण्यास नकार दिला. मनीषाशी संपर्क साधला असता तिने काम करण्यास होकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top