केजीएफ २ चे नवे पोस्टर रिलीज

केजीएफ २ चे नवे पोस्टर रिलीज

‘केजीएफ २’ चे नवे पोस्टर रिलीज साऊथचा सुपरस्टार यशने आतापर्यंत आपल्या धमाकेदार अभिनयाने अनेकांना वेड लावले आहे. त्याच्या ‘केजीएफ'' या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशने ‘केजीएफ २‘ चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. यशने पोस्टर शेअर करत हा चित्रपट एप्रिल २०२२ मध्येच प्रदर्शित होईल, असे सांगितले आहे. यशने शेअर केलेल्या नव्या पोस्टरमध्ये रॉकी भाई म्हणजेच यश एका अँग्री यंग मॅन लुकमध्ये दिसत आहे. तो काहीतरी विचार करत आहे, असे दिसते. यासह पोस्टरमध्ये धोक्याचे चिन्ह आहे, ज्यावर लिहिले आहे की, सावध राहा, पुढे धोका आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट १४ एप्रिल २०२२ देण्यात आली आहे. याचाच अर्थ निर्मात्यांनी हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि इतर कलाकार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com