वार्षिक अहवालात पाककृतींची माहिती

वार्षिक अहवालात पाककृतींची माहिती

वार्षिक अहवालात पाककृतींची माहिती विक्रीतून मिळणारा निधी समाजसेवेला मुंबई, ता. ९ ः फ्यूचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात लज्जतदार देशी-परदेशी पाककृतींची माहिती दिली असून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग समाजसेवेसाठी केला जाणार आहे. यासाठी त्यांनी युनायटेड वे मुंबई या समाजसेवी संस्थेबरोबर सहकार्य केले आहे. तळागाळातील वंचित समूहातील मुलांचे आरोग्य, पोषण व शिक्षण सुधारण्यासाठी या उपक्रमात काम केले जाईल. या अहवालाची किंमत १९९ रुपये असून तेवढाच निधी फ्यूचर जनरालीतर्फे दिला जाईल. या निधीचा वापर सहा महिने ते सहा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी केला जाईल. या उपक्रमामुळे वंचित वर्गातील मुलांचे सक्षमीकरण होईल, असे फ्यूचर जनरालीच्या रुचिका वर्मा यांनी सांगितले. या अहवालात कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा तपशील असेलच. त्याचबरोबर ख्यातीप्राप्त शेफने बनवलेल्या भारतीय, इटालियन तसेच संमिश्र चवदार खाद्यपदार्थांच्या पाककृतीदेखील असतील. हा वार्षिक अहवाल अॅमेझॉनवर विक्रीला असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com