Cold-fever-patient
Cold-fever-patientsakal media

सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा मुंबईला 'ताप'

पालिकेतर्फे फिवर क्लिनिक सुरू

मुंबई : कोविड बाधेची (corona infection) ही प्राथमिक लक्षणे मानली जातात. सर्वसामान्य विषाणूजन्य आजारातही तीच लक्षणे आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत कोविडचा एकही रुग्ण नजरेतून सुटू नये म्हणून खबरदारीचे उपाय महापालिकेने (bmc) सुरू केले आहेत. त्यानुसार खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी त्यांना उपचार आणि चाचण्यांबाबत मार्गदर्शन करतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी सांगितले. खासगी डॉक्टांची बैठक घेण्याबरोबरच विभागांमध्ये फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. (fever cold and cough patients increases in Mumbai)

Cold-fever-patient
नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती; नगरविकास मंत्र्यांच्या महामेट्रोला सूचना

टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागात अशी फिवर क्लिनिक होतील. जागा उपलब्ध असेल तिथे त्यांचे कॅम्प घेण्यात येतील. त्याचबरोबर पालिकेच्या दवाखान्यांमध्येही असे क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत, असे काकाणी यांनी सांगितले. वस्त्यांवर लक्ष कोविडची बाधा आतापर्यंत इमारतींमध्ये जास्त होत आहे. मात्र, पहिल्या लाटेप्रमाणे वस्त्यांमध्ये कोरोना विषाणू शिरून नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणूनही खबरदारी घेण्यात येत आहे.

संशयितांची चाचणी आणि विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. धारावी परिसरातील खासगी डॉक्टरांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविड चाचणी किटही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

कोविडची लक्षणे

ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी आणि छातीत दुखणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com