air pollution
air pollutionsakal media

वातावरणातील बदलाने हवाही प्रदूषित, मालाड, अंधेरीतील हवेचा स्तर वाईट

मुंबई : मुंबईकर सध्या गुलाबी थंडी (winter in Mumbai) अनुभवत आहेत, परंतु वातावरणात मोठ्या प्रमाणात होणारे बदल प्रदूषणवाढीस कारणीभूत ठरत आहेत. शनिवारी (ता. ८) दुपारी कुलाबा, माझगाव, मालाड यासह अंधेरी परिसरातील हवा प्रदूषित (Air pollution) असल्याची नोंद झाली. त्यातच शनिवारी शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी रविवारी (ता. ९) दिवसभर वातावरणात गारवा होता. त्यामुळे वातावरणातील या बदलाने मुंबईकरांना आजार बळवण्याची भीती व्यक्त होत आहे. (Air pollution in mumbai due to climate change situation)

air pollution
नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती; नगरविकास मंत्र्यांच्या महामेट्रोला सूचना

संपूर्ण मुंबईचा एक्यूआय शनिवारी मध्यम नोंदला गेला, पण त्याच तुलनेत कुलाबा, मालाड, अंधेरीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट नोंदला गेला असून एक्यूआय २०८ एवढा आहे. अनेक दिवसांपासून माझगाव परिसरातील हवा प्रदूषित होती. येथे मात्र सायंकाळची हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आणि एक्यूआय १६६ एवढा होता. मालाडपाठोपाठ अंधेरीतील हवा सायंकाळी वाईट दर्जाची होती. येथील एक्यूआय सर्वाधिक २३२ नोंदवण्यात आला आहे.

शनिवारी ‘सफर’ने मुंबईची हवा मध्यम दर्जाची नोंदवली. त्याआधी वाईट आणि अतिशय प्रदूषित असा दर्जा नोंदवण्यात आला होता. मुंबईचे वातावरण बदलले आहे. त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला आणि इतर आजार बळावण्याची भीती आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. अचानक थंडी, पाऊस, ऊन यामुळे आजार वाढले आहेत. आमची दररोजची ओपीडीही ३५० ते ४०० च्या पुढे असते. - डॉ. विनीता राणा, वैद्यकीय अधीक्षक, कान- नाक- घसा विभाग, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com