रेल्वे रुळ ओलांडून जीवाशी खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे रुळ ओलांडून जीवाशी खेळ
रेल्वे रुळ ओलांडून जीवाशी खेळ

रेल्वे रुळ ओलांडून जीवाशी खेळ

sakal_logo
By
रेल्वे रूळ ओलांडून जिवाशी खेळ रेल्‍वेच्या जनजागृतीकडे बेजबाबदार नागरिकांचा हरताळ पनवेल, ता. ९ (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होण्याचा धोका असूनही पनवेल रेल्वे स्थानक परिसरात धोका पत्करून नागरिक रूळ ओलांडत असल्याचे पाहायला मिळते. पादचारी मार्ग उपलब्ध असूनही अनेकांकडून त्‍याचा वापर केला जात नाही. रेल्वे विभागाकडून रूळ न ओलांडण्याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र तरीही काही बेजबाबदार नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसून येत आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरून दररोज लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी भागात चालणाऱ्या रेल्वेगाड्यातून लाखो नागरिक प्रवास करतात. रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे ३० ते ३५ हजार तिकिटे वितरित केली जातात. कोकण रेल्‍वे मार्गावर नवीन पनवेल व खांदा वसाहतीला जोडण्यासाठी उड्‌डाणपूल बांधण्यात आला आहे. पूर्वी याठिकाणी रेल्‍वे फाटक होते. आता ते बंद करण्यात आले आहे. रेल्‍वे मार्गालगत जलवाहिनी असून सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. असे असले तरी काही नागरिक रेल्‍वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्‍करतात. तर काही जण जलवाहिनीवरून मार्गक्रमण होत रूळ ओलांडतात. त्‍यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. ........... कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पनवेल रेल्वे स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफचे ४० कर्मचारी नियुक्त आहेत. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर त्यांच्याकडून कारवाई केली जाते. मात्र रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या पाहता करण्यात येणारी कारवाई नगण्य आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात अडचण येत असल्याची माहिती एका आरपीएफ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. ..........
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top