कोरोनादुतांना रोखण्यासाठी ठाणे पोलिस सज्ज

कोरोनादुतांना रोखण्यासाठी ठाणे पोलिस सज्ज

निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी ठाणे पोलिस सज्ज नागरिकांना मारहाण न करता कडेकोट बंदोबस्तासह जनजागृतीवर भर सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ९ ः कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी जारी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या आदेशाचे पालन करण्यासाठी ठाणे पोलिस सज्ज झाले असून आयुक्तालय क्षेत्रातील सर्व परिमंडळांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे; मात्र यंदा कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांना रोखताना ‘दंडुक्या’चा वापर न करता उलट सोसायट्यांमध्ये फिरून पोलिस जनजागृती करताना पाहायला मिळणार आहेत. ठाणे पालिकेसह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली आहे. ठाणे पालिका क्षेत्रात नवरुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठत तीन हजारांचा पल्ला गाठला आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच दुसऱ्या लाटेचे सर्व रेकॉर्ड मोडले जात आहेत. बाधितांची संख्या वाढत असली, तरी या संसर्गाची तीव्रता कमी आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन न लावता राज्य शासनाने निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार दिवसभर जमावबंदी; तर रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू असणार आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी रविवारी रात्रीपासून होणार असल्याने ठाणे पोलिस आयुक्तालयानेही आपली तयारी पूर्ण केली आहे. सुमारे पाच हजाराहून अधिक पोलिस या काळात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. याशिवाय होमगार्ड व राज्य राखीव दलाची तुकडीही मदतीला असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ठिकठिकाणी नाकाबंदी वाढवण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले आहेत. वेळेत सर्व आस्थापना बंद होतील तसेच संचारबंदीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे; मात्र कडक बंदोबस्त पाळताना कोणत्याही परिस्थितीत बळाचा वापर विशेषतः मारहाण करण्यात येऊ नये अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत; तर दुसरीकडे प्रत्येक वरिष्ठ पालिस निरीक्षकांना आपल्या हद्दीतील सोसायट्यांमध्ये नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करण्याचे आदेश आुयक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील लॉकडाऊनमध्ये नियम मोडल्यास जसा लाठीचा प्रसाद मिळत होता तसा आता मिळणार नाही, पण तरीही नियम पाळून पोलिसांना ‘संयम’ व कायदा, सुव्यवस्था पाळण्यास सहकार्य करा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. --- पोलिसांचे सोशल डिस्टंन्सिग ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पोलिस दलातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने बंदोबस्तात ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पोलिसांनीही काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिल्या आहेत. त्यासाठी नागरिकांच्या थेट संपर्कात न येता बंदोबस्तासाठी बॅरिकेट्सचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com