बारमाही शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

बारमाही शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

बारमाही शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मोखाड्यात दिगंत स्वराज फाऊंडेशनचा ऊपक्रम; ३२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मोखाडा, ता. ९ (बातमीदार)ः शेतीच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोखाडा तालुक्यातील मोऱ्हांडा गावातील दिगी-दहाड येथे दिगंत स्वराज फाऊंडेशनमार्फत उभारण्यात आला आहे. शेतातून बारमाही उत्पन्न मिळावे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सौरऊर्जा पंपाच्या साह्याने शेती प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पातून ३२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ३५ एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पामध्ये नदीत कोकण टाईप गेटचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यात एक कोटी लिटर पाणीसाठा करण्यात आला आहे. त्यावर पाच हॉर्स पॉवर क्षमतेचे सोलर पंप बसवण्यात आला आहे. या गावातील ३२ शेतकऱ्यांनी शेतकरी गट स्थापन करून सोलर पंपाची मागणी केली होती. दोन कि.मी. शेतीची पाईपलाईन पंपावर चालणार असून साधारण ३० ते ३५ एकरचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतातून बारमाही ऊत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. या शेतकऱ्यांनी भुईमूग, कांदे, वांगी इत्यादी भाजीपाला, पालेभाज्या तसेच आंबा व काजूसारखी फळझाडे लावण्याचे नियोजन केले आहे. बंधारा, सोलार प्रकल्प व शेतीचे व्यवस्थापन करण्याकरिता शेतकऱ्यांनी बचत गटाने दर महिन्याला बँक खात्यात बचत करण्याचे ठरवले आहे. त्यांना दिगंत स्वराज फाऊंडेशनमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. --- प्रकल्प उभारण्यासाठी द इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३१ ए थ्री आणि ए थ्री गव्हर्नर व लायन्स क्लब ऑफ ठाणे, नॉर्थ लायन्स क्लब ऑफ वेलिंग्टन क्रिसेंट यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. सोलार पंप व शेती पाईपलाईनकरिता लायन्स क्लब ऑफ महावीर नगर यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाला लायन्स क्लब डिस्ट्रिक ३२, ३१ ए थ्रीचे गव्हर्नर लायन डॉक्टर खाजा मुदस्सर, लायन विपुल शहा, लायन प्रदीप पटेल, लायन जयसिंग गांधी, तसेच दिगंत स्वराज फाऊंडेशनचे संचालक राहुल तीवरेकर, प्रकल्प अधिकारी श्रद्धा शृंगारपुरे, बीएसएफचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com