१८ मीटर रुंद रस्त्याला मंजूरी नाहीच

१८ मीटर रुंद रस्त्याला मंजूरी नाहीच

१८ मीटर रुंद रस्त्याला मंजुरी नाहीच भाईंदरकरांच्या पदरी निराशाच भाईंदर, ता.९ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम येथील चार झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र पर्यायी अठरा मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात आरक्षित करण्याचा प्रस्ताव सरकारने नामंजूर केला आहे. हा प्रस्तावित रस्ता नियोजनाच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे मत सरकारने व्यक्त केले आहे. त्यामुळे भाईंदर पश्चिमेतील नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. भाईंदर पश्चिम भागात नेहरू नगर, शास्त्रीनगर, क्रांती नगर, गणेश देवलनगर या मुख्य चार झोपडपट्ट्यांसाठी नव्या रस्त्याचा प्रस्ताव होता. या चारही झोपडपट्ट्या मुख्य रस्त्यापासून खूप आत आहेत. त्यामुळे महापालिकेने त्यात राहाणाऱ्या हजारो झोपडपट्टीवासीयांच्या सोयीसाठी तीन मीटर रुंदीपर्यंतच्या सिमेंट काँक्रिटच्या छोट्या गल्ल्या बांधून दिल्या आहे. मात्र. या गल्ल्या केवळ ये-जा करण्यापुरत्याच असून त्या अरुंद असल्याने मोठी वाहनांची ये-जा, सामानाची वाहतूक करणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना मुख्य रस्त्यापर्यंत सामानासह चालतच जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने २०१३ मध्ये या परिसरासाठी नवा अठरा मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. हा रस्ता नेहरू नगर झोपडपट्टीच्या मागच्या बाजूने सुरू होऊन शास्त्रीनगर, गणेशदेवल नगर, क्रांती नगर या झोपडपट्ट्यांपर्यंत जाणार होता. मात्र हा नवा रस्ता बांधण्यासाठी विकास आराखड्यात या रस्त्याचे आरक्षण करणे आवश्यक असल्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि मान्यतेसाठी तो सरकारकडे पाठवला होता. मात्र सरकारने आराखड्यातील या बदलाला मंजुरी नाकारली आहे. प्रस्तावित फेरबदलाच्या प्रस्तावाचे अवलोकन केले असता सदर जागेवरील विकास योजना रस्ता जागेवरील अतिक्रमणे लक्षात घेता नियोजनासाठी योग्य नसल्याचे मत सरकारने व्यक्त केले आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्यांसाठी नवा अठरा मीटर रुंदीच्या रस्त्याचा प्रस्ताव सध्या तरी बारगळला आहे. हा नियोजित रस्ता येथील रहिवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. त्यामुळे आधीच्या प्रस्तावात काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून रस्ता आरक्षणाचा प्रस्ताव महासभेपुढे आणावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. - अशोक तिवारी, नगरसेवक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com