पर्यावरण संवर्धनात मध्य रेल्वे आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संवर्धनात मध्य रेल्वे आघाडीवर
पर्यावरण संवर्धनात मध्य रेल्वे आघाडीवर

पर्यावरण संवर्धनात मध्य रेल्वे आघाडीवर

sakal_logo
By
पर्यावरण संवर्धनात मध्य रेल्वे आघाडीवर विविध उपाययोजनांद्वारे प्रतिष्ठेच्या ‘स्वच्छता शिल्ड’वर मोहोर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ९ : भारतीय रेल्वेने पर्यावरण जनजागृतीबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेतर्फेही पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाय योजले जात आहेत. पर्यावरण संवर्धनात आघाडीवर पोहचलेल्या मध्य रेल्वेला प्रतिष्ठेची ‘पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड’ पटकावण्यात यश आले आहे. मध्य रेल्वेमध्ये मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध उपायांचा अवलंब केला गेल्याने मध्य रेल्वेने सहाव्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार २०२१ मध्ये प्रतिष्ठित ‘पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड’ पटकावली आहे. मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, प्रकल्प आणि स्वयं-शाश्वत हरित स्थानके उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १०० टक्के डब्यांमध्ये बायो-टॉयलेट बसवण्यात यश आले आहे. त्यामुळे स्वच्छता होणार असून रेल्वेरुळाला लागणारा गंज टाळता येणार आहे. मध्य रेल्वेच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे रेल्वेची सुमारे १०६ हेक्टर जमीन रोपे लावण्यासाठी वापरण्यात आली आहे. सहा वर्षांत १५ रोपवाटिकांत सुमारे २५ लाख रोपे लावत आली आहेत. त्यात तीन मियावाकी वृक्षारोपण आणि वनौषधी उद्यानांचा समावेश आहे. ज्यामुळे कार्बन फूट प्रिंट कमी करण्यात आणि रेल्वेची अतिरिक्त जमीन सुरक्षित करण्यात मदत झाली आहे. भुसावळमध्ये उभारण्यात आलेले कम्पोस्टिंग प्लांट आणि लोणावळ्यातील कंपोस्टिंग मशीन सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्वापर करण्यायोग्य खतामध्ये रूपांतर करते. सीएसएमटी, नागपूर, सोलापूर आणि कल्याणमधील सेंट्रल रेल्वे स्कूल व वर्कशॉप युनिटसारख्या इतर युनिट्सना आयजीबीसी सुवर्ण प्रमाणपत्र मिळाले आहे. भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक ८७ इको-स्मार्ट स्थानके मध्य रेल्वेत आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत ८७ पैकी ७६ इको स्मार्ट स्थानकांना आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यातही मध्य रेल्वे यशस्वी झाली आहे. मध्य रेल्वेने राज्य/केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जल कायदा आणि वायू कायद्यांतर्गत मध्य रेल्वेच्या ८७ इको-स्मार्ट स्थानकांपैकी ७४ स्थानकांसाठी संमती मिळवली आहे. मध्य रेल्वेने प्रभावी जल व्यवस्थापनासाठीही विविध पावले उचलली आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्समुळे मागील वर्षाच्या तुलनेत १२.८६ टक्के पाण्याची बचत झाली आहे. ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट्स, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स, वॉटर री-सायकलिंग प्लांट्स आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्समुळे दररोज एक कोटी लिटर पाणी उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतर कोणत्याही झोनवरील सांडपाणी प्रक्रिया क्षमतेची ही सर्वोच्च क्षमता आहे. ------------------------------ माथेरान सांस्कृतिक रेल्वे महोत्सव पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता करण्यासाठी मध्य रेल्वेने नुकतेच माथेरान नगर परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘माथेरान रेल्वे उत्सव’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. उत्सवात माथेरान लाईट रेल्वेचा प्राचीन इतिहास मांडण्यात आला. मध्य रेल्वेच्या हरित उपक्रमांचे चित्रण आणि माथेरानचे पर्यावरण - संवेदनशील झोनमध्ये उत्क्रांतीचे चित्रण करण्यात आले. माथेरान लाइट रेल्वे सांस्कृतिक लँडस्केप म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले आहे. सांस्कृतिक लँडस्केपच्या ‘संरक्षण आणि व्यवस्थापना’ची युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक-२०२१ साठी शिफारस करण्यात आली आहे. ------------------------------
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top