जूचंद्रमधील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जूचंद्रमधील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
जूचंद्रमधील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जूचंद्रमधील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By
जूचंद्रमधील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विरार (बातमीदार) : इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. इयत्ता ५ वीच्या परीक्षेत चैत्राली देसाई (६२.६७ टक्के) तालुक्यात नववी व पालघर जिल्ह्यात ५४ वी आली. दक्ष यवुराज नंदरुकर (४७.३३ टक्के) तालुक्यात ४७ वा आला आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व रंगू राठोड (४९.६६ टक्के) गुण मिळवून तालुक्यात २१ वा व जिल्ह्यात ३७ वा आला आहे. रयत शिक्षण संस्थेचे सदस्य विनय पाटील, पुरुषोत्तम पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक एस. पी. पगार, उपमुख्याध्यापक आर. बी. नाडेकर, जितेंद्र भोईर, सुविधा गावंड, एस. एस. सनदी यांचे अभिनंदन केले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top