बेलापूरमध्ये पहिले बहुमजली वाहनतळ

बेलापूरमध्ये पहिले बहुमजली वाहनतळ

बेलापूरमध्ये पहिले बहुमजली वाहनतळ वाहनतळ उभारणीनंतर रस्त्यावरील वाहनांवर कारवाई वाशी, ता १० (बातमीदार) ः नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर ११ मधील बहुमजली वाहनतळानंतर महापालिका शहरातील प्रत्येक सिडको नोडमध्ये बहुमजली वाहनतळ उभारणार आहे. त्यानंतरच रस्त्यावर उभ्या राहात असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उभारणार आहे. नवीन वर्षांत बेलापूरमध्ये पाच मजली वाहनतळाची इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे सीबीडी परिसरात असलेल्या वाणिज्यक संकुलासमोर वाहने उभी न करता, बहुमजली वाहनतळावर उभी करून चालकांनी इच्छित स्थळी जाणे, अभिप्रेत आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्‍याने कोंडी होते. त्‍यामुळे वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. नवी मुंबईत एक सर्वेक्षणानुसार, ८० ते ९० हजार वाहने रस्त्यावर उभी राहात आहेत. यात सिडकोच्या बैठ्या घरातील रहिवाशांच्या वाहनांची संख्या जास्त आहेत. नवी मुंबईत वाहनतळांची समस्या गंभीर असून महापालिकेने काही ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्कसाठी कंत्राटे दिली आहेत. वाहने उभी करण्यावरून अनेकदा कंत्राटदारांबरोबर वाहनचालकचे खटके उडत असल्याचे दिसून येते. सिडकोच्या वाहनतळ ठेकेदारीमध्ये अनियमितता आहे. बेलापूर सेक्टर ११ मध्ये सिडकोकडून घेतलेल्या एक एकरच्या भूखंडावर नवी मुंबई महापालिका २९ कोटी रुपये खर्च करून एक बहुमजली वाहनतळ उभारत आहे. शहरातील हे पहिले बहुमजली वाहनतळ आहे. बेलापूर-सीबीडी या भागात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासगी व बँकांचे मुख्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहने रस्त्यावर उभे करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पालिकेने पहिल्यांदा सीबीडी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) भागात हे बहुमजली विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात इमारत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या वर्दळींच्या ठिकाणीही बहुमजली वाहनतळ बांधल जाणार आहे. त्यासाठी पालिकेने विकास आराखड्यात आरक्षण नमूद केले होते. पण सिडकोने या उद्देशासाठी ठेवलेले भूखंड विकण्याचा सपाटा लावला आहे. सिडको सार्वजनिक हितासाठी भूखंड उपलब्ध करून दिल्यास पालिका सर्व नोडमध्ये बेलापूर प्रमाणे पार्किंगसाठी बहुमजली इमारत बांधण्याच्या विचारात आहे. प्रत्येक नोडमध्ये वाहनतळ उपलब्ध करून दिल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर उभ्‍या केलेल्‍या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुविधा निर्माण केल्याशिवाय वाहनांवर कारवाई करणे योग्य ठरणार नाही. - अभिजित बांगर, आयुक्‍त, नवी मुंबई पार्किंग समस्या गंभीर नवी मुंबईतील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे मिळणाऱ्या वाढीव चटई निर्देशाकांने शहरात अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. यात वाहनतळांची व्यवस्था घराच्या क्षेत्रफळाप्रमाणे करण्यात आली आहे. मात्र सिडकोनिर्मिती बैठी घरे आणि गावातील बेकायदा बांधकामामुळे शहरात वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com