ऑनलाईन शिक्षणात खंड पडू देऊ नका!

ऑनलाईन शिक्षणात खंड पडू देऊ नका!

ऑनलाईन शिक्षणात खंड पडू देऊ नका! शालेय शिक्षण मंत्र्यांचे संचालकांना आदेश मुंबई, ता. १० : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नसल्याने ''माझे विद्यार्थी माझी जबाबदारी'' अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शिक्षण संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुलांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू देऊ नका, असे आदेश शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यामध्ये पहिली ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com