कारवाई पथकावर कांदे-बटाट्याचा मारा

कारवाई पथकावर कांदे-बटाट्याचा मारा

कारवाई पथकावर कांदे-बटाट्याचा मारा प्लास्टिकवरील कारवाईस कल्याणात व्यापाऱ्यांचा विरोध कल्याण, ता. ११ (बातमीदार) : कल्याणमधील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट परिसरात सोमवारी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर फेरीवाले आणि दुकानदारांनी कांदे, बटाटे फेकून मारल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद पालिका मुख्यालयात उमटले असून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली. प्लास्टिक निर्मूलन सप्ताहाअंतर्गत कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत धडक कारवाई सुरू आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास पालिका सहायक आयुक्त सुधीर मोकल यांच्या नेतृत्वाखाली फेरीवालाविरोधी पथक आणि घनकचरा विभाग कर्मचारी, अधिकारी पथक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट परिसरात कारवाईसाठी गेले होते. ते पाहून व्यापाऱ्यांनी एपीएमसीतील वीज बंद केली. या वेळी तेथील दुकानदार आणि फेरीवाल्यांनी पथकावर अचानक कांदे, बटाटे फेकून हल्ला केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हल्ला करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समजताच पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष सचिन बासरे, सुरेश तेलवणे, सुनील पवार, हिरा बेराडिया आदी पदाधिकारी आणि घनकचरा विभाग कर्मचारी वर्गाने एकत्र येत पालिका मुख्यालयात घटनेचा निषेध केला. पथकाला पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली. कोट यापुढे आयुक्त यांच्या मंजुरीनंतर पथकाला पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात कायदेशीर कारवाई सुरू आहे. रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com