रेवदंड्यात अवकाळी पावसाने रस्ते उखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेवदंड्यात अवकाळी पावसाने रस्ते उखडले
रेवदंड्यात अवकाळी पावसाने रस्ते उखडले

रेवदंड्यात अवकाळी पावसाने रस्ते उखडले

sakal_logo
By
रेवदंड्यात अवकाळी पावसाने रस्ते उखडले रेवदंडा (बातमीदार) : येथील बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. अवकाळी पावसात हे खड्डे आणखी उखडल्याने वाहने आदळून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. गोळा स्टॉप ते आगरकोट आणि बाजारपेठेतील पारनाका परिसरात असंख्य खड्डे आहेत. दुचाकी वाहनचालकांना तर रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. परिणामी, दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे. अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांचे आकारही वाढले आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खाते अलिबाग यांच्याशी खड्डे कधी भरले जाणार यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top