४४२ अनधिकृत नळजोडणी खंडित

४४२ अनधिकृत नळजोडणी खंडित

४४२ अनधिकृत नळजोडण्या खंडित कल्याण-डोंबिवली पालिकेची धडक कारवाई कल्याण, ता. १२ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. महापालिका प्रशासनाने ऑक्टोबर २०२१ पासून आतापर्यंत ४४२ अनधिकृत नळांचा पाणीपुरवठा तोडला असल्याचे सांगण्यात आले आहे. पालिका हद्दीत अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण ४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. यापैकी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून ३६० द.ल.लि. आणि एमआयडीसीकडून ५५ द.ल.लि पाणीपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असूनही काही भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका परिसरातील अनधिकृत चाळी आणि अनधिकृत इमारतीतील नळजोडणी शोधून खंडित करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले होते. पालिकेच्या डोंबिवली पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्या पथकाने ३६३ नळजोडणी आणि कल्याण विभागात कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांच्या पथकाने ७९ अनधिकृत नळ कनेक्शन शोधून खंडित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com