एसी लोकलमध्ये लवकरच लगेज डबा

एसी लोकलमध्ये लवकरच लगेज डबा

एसी लोकलमध्ये लवकरच लगेज डबा डबेवाले, फेरीवाल्यांची सोय होणार; फॅक्टरीला सूचना सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नॉन एसी लोकलसह एसी लोकलच्या फेऱ्या धावत आहेत. येत्या काळात सर्वाधिक एसी लोकल धावणार आहेत. मात्र या एसी लोकलला लगेज डबा नसल्याने डबेवाले, फेरीवाले, अवजड सामग्री घेऊन जाणाऱ्यांना एसी लोकलचा वापर करता येत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी आता एसी लोकलमध्ये लगेज डबा तयार केला जाणार आहे. त्यामुळे डबेवाले, फेरीवाल्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. उपनगरीय लोकलमधून सर्व स्तरातील प्रवासी प्रवास करतात. त्यानुसार डबेदेखील तयार केले आहेत. महिला वर्गासाठी महिला डबा, दिव्यांगासाठी डबा, प्रथम श्रेणी डबा नॉन एसी लोकलमध्ये आहे. १२ डबा नॉन एसी लोकलमध्ये चार चार व्हेंडर कंपार्टमेंट आहेत. मात्र इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून आलेल्या एसी लोकलमध्ये असे वेगळे व्हेंडर कंपार्टमेंट नाही. त्यामुळे लगेजसाठी विशेष व्हेंडर कंपार्टमेंट आवश्यक आहे. याबाबत इंटिग्रल कोच फॅक्टरीला देखील सुचविण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. उपनगरीय लोकलमधील लगेज डबा हा अविभाज्य भाग बनला आहे. या डब्याच्या दरवाजाला मध्यभागी रॉड नाही. त्यामुळे मोठ्या टोपल्या, डब्यांचा ट्रे, अवजड सामग्री आत-बाहेर करता येते. यासह डब्यांचे फ्लोअरिंगदेखील खास बनवलेले असते. ... माशांचा वास पसरणार नाही... लगेज डब्यामधून मासे विक्री करणारेदेखील प्रवास करतात. मात्र एसी लोकलमधून मासे नेल्यास माशांचा वास संपूर्ण लोकलमध्ये पसरू शकतो. मात्र हवेच्या परिसंचरणेने संपूर्ण लोकलमध्ये माशांचा वास पसरणार नाही, ज्या ठिकाणी हे डबे असणे आवश्यक आहे, तेथे एसी एअर सर्कुलेशन व्हेंट्स ब्लॉक केले जातील, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com