कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद नवीन पनवेल ता. ११ (वार्ताहर) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी सरकारने पुन्हा निर्बंध लागू केल्याने पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्य सोमवारपासून (ता. १०) बंद ठेवण्याचा निर्णय अभयारण्य प्रशासनाने घेतला आहे. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पनवेल जवळ असल्याने शहरातील नागरिक दररोज हजेरी लावत असतात. तसेच पक्षी निरीक्षण हे या अभयारण्यातील महत्त्वाचे मुख्य आकर्षण असल्याने पर्यटकांचा नेहमी राबता येथे असतो. सद्यस्थितीत पनवेल ग्रामीण भाग आणि शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com