महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे उपोषण

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे उपोषण

पुणे, ता. ११ : प्राध्यापक भरतीसंदर्भातील नोव्हेंबर २०२१चा निर्णय आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसंदर्भात डॉ. धनराज माने यांच्या समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित सुरू करावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्यावतीने उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

अकृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदभरती सुरू न होणे, विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान देणे यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील सुमारे एक हजार १७१ अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक पदभरतीला ४० टक्केनुसार दोन हजार ८८ जागांची भरती करण्यात १२ नोव्हेंबर २०२१मध्ये मान्यता देण्यात आली. पदभरतीतील आरक्षणासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ रोजी संवर्गनिहाय आरक्षण विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. परंतु, याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पद भरतीला परवानगी देताना शिक्षण संचालक, ग्रंथपाल तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता न दिल्याने पात्रता धारकांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी संघटनेची मागणी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती प्रक्रिया रखडली आहे. या प्रक्रियेला गती येणे आवश्यक असून राज्य सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्या ४ जुलैपासून उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
-डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

प्रमुख मागण्या...
- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसंदर्भात समितीचा अहवालाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी
- अकृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक पदभरती त्वरित करावी
- २०१६ नंतरच्या सहाय्यक प्राध्यापकांना वेतनवाढ तत्काळ मिळावी
- ऑक्टोबर २०१७च्या आकृतिबंधाला मान्यता देऊन डिसेंबर २०२१पर्यंतची सर्व रिक्त पदे भरावी
- विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान मिळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com