उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असतानाच उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. या रुग्णालयातील एक डॉक्टर, ५ नर्स आणि ४ कर्मचारी अशा १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. कर्जत ते कसारापर्यंतचे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी या मध्यवर्ती रुग्णालयात येतात. सेवा देताना आणि दाखल करताना डॉक्टर, नर्स, कर्मचारी या रुग्णांच्या सातत्याने संपर्कात येतात. त्यातील बहुतांश जणांची कोविड चाचणीही झालेली नसते. त्यातून ही लागण झाल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com