पलावा सिटीतील मालमत्ताधारकांची दुहेरी करातून सुटका होणार

पलावा सिटीतील मालमत्ताधारकांची दुहेरी करातून सुटका होणार

पलावा सिटीतील नागरिकांना दिलासा दुहेरी करातून सुटका होणार डोंबिवली, ता. १३ ः केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पापैकी पलावा शहर हे एक आहे. पलावा शहराकडून पलावा वसाहत व्यवस्थापन आणि कल्याण-डोंबिवली पालिकेकडे कर भरण्यात येतो. या दुहेरी करामुळे पलावा शहर आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांचे पुनर्मूल्यांकन करून दुहेरी करातून पलावा मालमत्ताधारकांची सुटका करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली पालिकेकडे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. पलावा सिटीतील मालमत्ताधारकांना करात ६६ टक्के सूट देण्याचा सरकारचा जीआर असतानादेखील त्याची अंमलबजावणी होत नाही. याविषयी आमदार पाटील यांनी कर विभागप्रमुख विनय कुळकर्णी यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी महिनाभरात हा विषय मार्गी लावण्याचे कुळकर्णी यांनी सांगितले. यामुळे लवकरच पलावावासीयांची दुहेरी करातून सुटका होणार आहे. आमदार पाटील म्हणाले, पलावा ही इंटिग्रेटेड टाऊनशिप आहे. या टाऊनशिपला मान्यता देताना सरकारने विकासकांना काही सवलती दिल्या होत्या. तसेच या ठिकाणी घर घेणाऱ्या मालमत्ताधारकास त्यांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट दिली जाणार होती. त्याविषयीचा जीआर सरकारने २०१६ मध्ये काढला आहे. पालिका प्रशासनाने मात्र यात सूट न देता २५ हजार फ्लॅटधारकांकडून जवळपास १५ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. मालमत्ताधारकांनी जास्तीचा कर भरला असून या दुहेरी करातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी कर विभागास केली होती. कर विभागाचे कुळकर्णी यांनी पाटील यांना सांगितले, की टाऊनशिपला एमएमआरडीएची परवानगी होती. त्यामुळे याविषयीचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांच्याकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून सूट देण्याचा विषय हा धोरणात्मक आहे. आयुक्त स्तरावर लवकरच एक बैठक घेऊन त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यानुसार हा विषय महिनाभरात मार्गी लागेल. या वेळी पाटील त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील, गजानन मांगरूळकर, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com