पेणमध्ये आठवडा बाजार बंद करा

पेणमध्ये आठवडा बाजार बंद करा

पेणमध्ये आठवडा बाजार बंद होणार? विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई पेण, ता. १२ (वार्ताहर) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पेणमध्येही कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहरातील आठवडा बाजार तत्काळ बंद करावा, अशी मागणी होत आहे. पाच-सहा दिवसांपासून पेण नगरपालिका ॲक्टिव्ह मोडवर आली असून, शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे या वेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. पेण शहरात नगरपालिकेचे कर्मचारी दिवसभर फिरत आहेत. रस्ते, दुकान, टपरीवर अथवा भाजी मार्केटमध्ये विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अटल आहे. त्यामुळे पेणमधून कोरोनाला घालवायचे असेल, तर नियमांचे पालन करा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असेल तेथील निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. जानेवारी २०२२ च्या सुरुवातीपासूनच पेणमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यातच सोमवारी पेण तालुक्यात १४४ रुग्णसंख्या आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहावे लागले आहे. तर दुसरीकडे नागरिक आणि विद्यार्थी यांची लसीकरणाला पसंती वाढल्याने रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण वाढत आहे. परंतु, आठवडा बाजाराच्या नावाखाली पेण शहरात येणाऱ्या परप्रांतीयांना आता तत्काळ रोखणे महत्त्वाचे आहे. शहरातील मंगळवारचा भरणारा आठवडा बाजार बंद केला, तर गर्दी वाढणार नाही. यामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे. त्यामुळे बाजार आणि गर्दीचे ठिकाण बंद करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी केली आहे. पेण शहरात तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून नियमांचे पालन करावे, याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. बाजारात वाढती गर्दी पाहता मंगळवारचा आठवडा बंद करण्याबाबतचा विचारविनिमय मुख्याधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन वेळ पडल्यास बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. - राजाराम नरुटे, प्रशासन अधिकारी, पेण नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com